News34 chandrapur (रमेश निषाद)
बल्लारपूर - रविवार पासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. Rain yellow alert
विजेचा कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने दोघांचा जीव घेतला, ब्रह्मपुरी व सावली शेतात काम करीत असताना वीज कोसळली. Heavy rainfall
चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात यंदा एका महिन्यात तब्बल 4 वेळा पूर आला, मात्र यावर काय उपाययोजना करावी हे अजूनही प्रशासन व नेत्यांना सुचत नाही आहे. Monsoon update
चंद्रपूर शहरातील नाले तुडुंब भरल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर आले होते.
बल्लारपूर शहरातील दुर्गा माता मंदिर जवळ पाणी पुढे जायला आधी मोठा नाला होता, मात्र जड वाहनांची वाहतूक व्हावी यासाठी लहान पाईप टाकत त्याठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. Flood situation
त्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने नाल्यातील संपूर्ण पाणी रस्ता ते वस्तीत शिरत आहे.
तसेच बल्लारपूर शहरातील सरदार पटेल वार्डातही हीच परिस्थिती कायम आहे, खाजगी कंपणीद्वारे पाणी जाण्याचा मार्ग बंद केल्याने पावसाचे पाणी नालीद्वारे नागरिकांच्या घरात शिरले, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रात्र पाण्यात काढावी लागली.
नागरिकांनी मदतीसाठी वेकोली अधिकाऱ्यांना सम्पर्क केला मात्र मनुष्यबळ नसल्याचे कारण देत मदतीसाठी कुणी आले नाही.
सध्या पुढील 3 दिवस जिल्ह्यात पाऊस थैमान घालणार असून जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Ballarpur - Heavy rains started in Chandrapur district from Sunday.
The rain that started with lightning took the lives of both, Brahmapuri and Savli were working in the fields when the lightning struck them.
In the history of Chandrapur district, this year there was flood 4 times in one month, but the administration and leaders still do not suggest what measures should be taken in this regard.
As the drains in Chandrapur city were overflowing, the water from the drain came to the road.
Earlier, there was a big drain near the Durga Mata temple in Ballarpur city, but the place was asphalted by laying small pipes to facilitate the movement of heavy vehicles.
Therefore, as there is no way for the water to go, the entire water in the drain is entering the road to the settlement.
Also, the same situation continues in Sardar Patel Ward of Ballarpur city, due to the closure of the water channel by the private company, the rain water entered the houses of the citizens through drains, so the citizens living in the area had to spend the night in water.
The citizens contacted the wcl authorities for help, but no one came to help citing lack of manpower.
At present, there will be heavy rain in the district for the next 3 days and a yellow alert has been issued for the district.
