News34 chandrapur
राजुरा - राजुरा-बामणी रेल्वे पुलाजवळील मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत.त्यामुळं वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून आमदार साहेब मात्र गाढ झोपेतच असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी केला आहे.
दरम्यान 500 मे बिक जाओगे तो ऐसाही रोड पाओगे अशी टीका सुद्धा यावेळी करण्यात आली.तसे बॅनर सुद्धा बामणी राजुरा रोड, नाका क्रमांक 3 आणि राजुरा,रामपूर येथे लावण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत तेलंगणा राज्यातून व राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणारा हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे.या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक होत असते. मात्र या रस्त्यांची सध्या दैनावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर राजुरा शहरातील मुख्य रस्ता व नाका क्रमांक 3 येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रामपूर रस्त्याची अवस्थाही अतिशय बिकट झाली आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीवसुद्धा जात आहे.
Potholes on the main road
विशेष म्हणजे आमदार सुभाष धोटे सुद्धा याच मार्गाने येजा करत असून या मार्गावरील मोठमोठे खड्डे आमदार साहेबांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल सुद्धा वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी केला आहे.त्यामुळे या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिला आहे.