News34 chandrapur
ब्रह्मपुरी - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील असलेल्या आवळगाव येथील धृपता श्रावण मोहुर्ले वय वर्षे 55 हि महीला आपल्या शेतातील धान पिका मधिल निदंन काढीत असतांना शेतशिवारात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच ठार करून जंगलाच्या बाजुला ओढत नेल्याची घटना आज सायंकाळी तिन वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी येथील पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. tiger attack
या आधी सुद्धा अशा अनेक घटना आवळगाव येथे घडले असून गावातील जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
संबंधीत वनविभागाने वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
