News34 chandrapur
चंद्रपूर - प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढत त्या घटनेला चोरीच्या प्रकरणात रूपांतर करणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत अटक केली. Crime uodate
22 सप्टेंबरला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी वार्डातील विश्वकर्मा चौकात राहणाऱ्या मनोज रासेकर याचा घरी अज्ञात चोरांनी लूटमार करीत हत्या केली अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली होती, मध्यरात्री 1.30 ते 2 वाजेदरम्यान ही घटना घडली, घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट देत सदर प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. Chandrapur police पत्नीच्या व आईच्या साक्षवरून मध्यरात्री एक अज्ञात इसम घरात आला व पैसे व दागिन्यांची मागणी केली, व मनोज रासेकर याचा उशीने दाबून खून केला. यावेळी मृतकाची आईसुद्धा त्यावेळी हजर होती. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सपोनि जितेंद्र बोबडे व संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार केले. याबाबत सायबर सेलची मदत घेण्यात आली, तांत्रिक बाबीत व गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मृतकाची पत्नी सुनीता हिचे मुलीच्या शाळेतील शिक्षकसोबत ओळखी होत, प्रेमसंबंध जुळले होते, प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या मनोज चा काटा कसा काढायचा याचा कट रचला गेला. मनोज हा मागील 15 दिवसापासून आजारी होता, त्याचा खून करीत तो आजारपणामुळे दगावला असे सुनीता ला दाखवायचे होते. दिवस ठरला 22 सप्टेंबरला मध्यरात्री आरोपी शिक्षक स्वप्नील गावंडे हा मनोज च्या घरी आला व उशीने मनोज चे तोंड दाबले, मात्र त्यावेळी दोघांची झटापट झाली, आवाज ऐकून मृतकाची आई मनोज च्या रूमकडे आली, आता आपलं बिंग फुटणार असे समजताच सुनीता ने चोरीचा बनाव करीत रूममधील सामान अस्तव्यस्त केले, व आरोपी स्वप्नील ने मृतकाची पत्नी व आईकडून सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.
प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आजारी पतीचा काटा काढण्याचा प्रयत्न जरी यशस्वी झाला असला तरी मृतकाच्या आई मुळे हे बिंग अखेर फुटले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आरोपी 34 वर्षीय स्वप्नील ताराचंद गावंडे, रा. घुटकाला चंद्रपूर व 35 वर्षीय सुनीता मनोज रासेकर यांना ताब्यात घेतले. Local crime branch chandrapur सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, संदीप कापडे, संजय आतकुलवार, संतोष एलकुलरवार, संतोष रायपुरे, रवी पंधरे व सायबर सेलचे मुजावर अली, अमोल सावे, वैभव पत्तिवार व उमेश रोडे यांनी केली.