News34 chandrapur
चंद्रपूर - आपण अनेक नवनवीन वेगळ्या बातम्या ऐकल्या असतीलचं जसे कधी विहीर, नदी चोरीला जाते तसेच चंद्रपुरातील दुर्गापूर भागातला 135 मीटर चा रस्ता चोरीला गेला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
झालं असं की दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये अनेक वर्षांपासून नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नव्हता.
वर्ष 2021 ला खनिज विकास निधीतून अनेक प्रलंबित रस्त्यांचे कामे मंजूर करण्यात आले, त्यामध्ये दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 मधील ताडोबा रोड ते रुखसाना शेख यांच्या घरापर्यंत 135 मीटर रस्त्याच्या खडीकरणासाठी 10 रुपयांचा निधीही मंजूर झाला. District Mineral Development Fund
रस्त्याचे काम सुरू झाले, कालांतराने काम पूर्ण झाले मात्र या कामात एक गडबड झाली.
रस्त्याचे काम झाले पण ते काम प्रस्तावित ठिकाणी करण्यात आले नाही असा थेट आरोप दुर्गापूर ग्रामपंचायत चे माजी सदस्य राजेंद्र मेश्राम यांनी लावला आहे. Road development
काय आहे नेमकं प्रकरण?
खनिज विकास निधीतून तब्बल 10 लाख रुपये मंजूर करीत ताडोबा रोड ते रुखसाना शेख यांच्या घरापर्यंत 135 मीटर रस्त्याचे खडीकरणाचे काम मंजूर करण्यात आले.
पण तो रस्ता प्रस्तावित ठिकाणी झाला नाही, तो रस्ता त्या भागातील दुसऱ्या ठिकाणी ते सुद्धा ताडोबा रोड च्या 150 मीटर अंतर असलेल्या भागात करण्यात आला.
त्या ठिकाणी कुठल्याही रस्त्याचे काम मंजूर झाले नाही, अधिकाऱ्यांनी संगनमत करून प्रस्तावित जागेवर मंजूर असलेला रस्ता दुसऱ्या ठिकाणी करण्यात आला.
यामध्ये दोषी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्करवार, उपविभागीय अभियंता चव्हाण, शाखा अभियंता नायर, कंत्राटदार साई MSS गडचांदूर व सरपंच दुर्गापूर पूजा मानकर हे असून यांचेवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
रुखसाना शेख काय म्हणतात?
मागील 20 वर्षांपासून आमच्या भागात रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, हा रस्ता झाला असता तर आम्हाला सोयीचे झाले असते, मात्र सदर रस्त्या आमच्याकडे झाला नाही, आम्ही आजही अठरा विश्व दारिद्र्य भागात जगत आहो.
राजेंद्र मेश्राम म्हणतात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अन्यथा आम्ही वार्डवासी अधिकाऱ्यांविरोधात आमरण उपोषण करू.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भास्करवार यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी रस्ता मंजूर झाला असल्याचे सांगितले, काही लोक नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. Paving of the road
ज्याठिकाणी रस्ता मंजूर झाला त्याचठिकानी काम पूर्ण करण्यात आले आहे, याबाबत आमचे अभियंता जाऊन मोका चौकशी करून आले आहे.