News 34 chandrapur
चंद्रपुर :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिये संदर्भात प्रत्यक्ष मुलाखत घेणे करीता रायुकॉं प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख स्वःता चंद्रपुर जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठिनी त्यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जवाबदारी दिली यानंतर रिक्त झालेल्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाकरीता इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहे त्याकारिता शेख यांचा दौरा आहे.
Ncp news
जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इच्छुक सदस्य व पदाधिकाऱ्यांकरीता Google Form बनविण्यात आला असून तो ६ सप्टेंबर पर्यंत भरून अर्ज करावेत. तसेच मुलाखत दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता स्थानिक विश्रामगृह येथे होईल. सदरील मुलाखतीला अर्जकर्त्यांनी आपल्या बायोडेटा सहित उपस्थित राहावे असे आव्हाहन प्रदेश कार्याध्यक्ष नितिन भटारकर यांनी केले आहे. Mehboob shaikh ncp