News34 chandrapur (गुरू गुरनुले) मुल - क्रांतिज्योती नागरी सहकारी पतसंस्थेनी गांधी चौक जुन्या कार्यालयाचे मागे स्वतःच्या मालकीच्या जागेवर स्वतंत्र नवीन इमारत बांधली असून इमारतीचा लोकार्पण सोहळा २८ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि माजी.जी.प अध्यक्षा तथा संस्थेच्या संचालिका संध्याताई गुरनुले यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोळे तर प्रमुख अतिथी माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व संचालक अरुण तिखे, उपस्थित होते. मुल नगरात अल्पावधित स्वतंत्र सुंदर इमारत उभी करणारी पहिली संस्था आहे. ही संस्था नक्कीच प्रगती करेल.पण कर्ज परतफेड करण्याची कर्जदाराची मानसिक बदलली असून बिना मार्गेज कर्ज देऊ नये असा सल्ला देत मी सुद्धा संस्थेला ठेवी देणार असल्याचे जाहीर केले. संस्था मोठया मेहनतीने उभी केली असून सर्व सभासदांनी व इतरही शुभचींतकानी आर्थिक ठेवी, ठेवी देऊन संस्थेला पुढे नेण्यास हातभार लावावा असे अमूल्य मार्गदर्शन संध्याताई गुरनुले यांनी केले.
सोहळ्याचे अध्यक्ष प्रा.रामभाऊ महाडोळे यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना कर्ज घेणाऱ्याने मुदतीच्या आत कर्ज फेड करावे. कारण कर्ज वसुली करणे हाच पतसंस्थेचा आत्मा असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी संचालक अरुण तीखे यांनीही माळी महासंघाच्या प्रेरणेतून पत संस्था निर्माण झाल्याचे सांगून ठेवीदार,खातेदार,कर्जदार कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.मंचावर निमंत्रक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोती टहलियानी, चंद्रपूर महापालिकेच्या माजी नगरसेविका वंदना तीखे, रुपेश मारकवार, संचालक पी.व्ही. कोमलवार, यांचेसह राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर, वर्षा लोनबले निमंत्रक शुभचिंतक सर्व संचालक,सल्लागार उपस्थित होते. सोहळ्याचे संचालन भाऊजी लेनगुरे तर प्रास्तविक उपाध्यक्ष गुरुदास चौधरी यांनी केले व आभार संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी मानले. लोकार्पण सोहळ्याला अनेक सभासद उपस्थित होते.

याच पतसंस्थेची १८ वी वार्षिक सर्व साधारण सभा रामलीला भवन मुल येथे पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. गुरु गुरनुले यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. क्रांती ज्योती यांचे प्रतिमेचे पूजन करुन व सभेच्या आर्थिक वर्षात दिवंगत झालेल्या संचालक, खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. सुरवातीस जिल्हा सहकारी बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी पी.सी. फलके यांनी उपस्थित सर्व सभासदांना व संचालक मंडळाने सहकार कायद्याची जाणीव व सभासदांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या याबाबत प्रशिक्षण दिले.
सभेचे प्रास्तविक उपाध्यक्ष गुरुदास चौधरी यांनी केले. तर माजी उपाध्यक्ष भिं .तू. भेंडारे यांनी संस्था स्थापनेच्या वेळी आलेल्या अडचणी उपस्थित सभासद यांचे समोर मनोगतामधून व्यक्त केल्या. विषय सुचीनुसार संपूर्ण अहवाल वाचन व्यवस्थापक आर. टी. गुरनुले यांनी केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर संस्थेचे सल्लागार प्रा.रामभाऊ महाडोळे यांनी दिले. संस्थेचे संचालक मंडळ सर्वांशी समन्वय साधून,योग्य सल्ला घेऊन संस्थेची प्रगती करीत आहेत.परंतु संस्थेच्या आपण सर्व सभासदांनी ठेवी ठेऊन,सेविंग खाते काढून आर्थिक बळ दिल्यास संस्था नक्की भरभराटीस येईल असे मार्गदर्शन केले. तर संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी संस्थेचे ध्येय,संकल्प आणि विस्ताराबाबत माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणा मधून देऊन उपस्थितांना आश्र्वासित केले. सभेला संचालिका संध्याताई गुरनुले,अरुण तीखे, पुरुषोत्तम कोमलवार, रत्नमाला ठाकरे, अशोक येरमे, अजय महाडोळे, सुषमा रायपुरे, चलदेव मादाडे मंचावर उपस्थित होते. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन रोखपाल भाऊजी लेनगुरे यांनी केले.