News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - झाडीबोली साहित्य मंडळ झाडीपट्टीचे वैशिष्ट्ये साहित्यातून समोर आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. याचाच एक प्रेरक भाग म्हणून दरवर्षी साहित्याबरोबर सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या झाडीपट्टीतील कायकर्त्यांना झाडी युवा चैतन्य पुरस्कार देत असते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाडीबोली साहित्य मंडळाच्या निवड समितीने झाडीबोली संवर्धन आणि चळवळीसाठी भरीव योगदान देणाऱ्या मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य गणेश खोब्रागडे यांची झाडी युवा चैतन्य पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. Award
झाडी युवा चैतन्य पुरस्कार निवड समितीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, जिल्हा महिलाअध्यक्ष प्रा.रत्नमालाताई भोयर व जिल्हासदस्य लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल्यांकन व परिक्षणाचे काम केले. झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या जुनासुर्ला येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य गणेश खोब्रागडे यांना १८सप्टेंबर २०२२ ला गोंडपीपरी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. गणेश खोब्रागडे हे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील युवा नेतृत्व असून आपल्या अभ्यासू वृत्तीने गावविकासासाठी झटून विविध योजनांची यशस्वी अमलबजावणी केली आहे. सामाजिक भान असलेले गणेश खोब्रागडे प्रहार सेवधर्मी मंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसांची जोपासना व संवर्धनाचे अनमोल कार्य करीत आहेत .
साहित्यावर प्रेम असलेले गणेश खोब्रागडे यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याकरिता २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आपल्या जुनासुर्ला या गावी आयोजित करून पंचक्रोशीत सर्वांना साहित्य विश्वाची अनुभूती दिली. कोणावर विसंबून न राहता स्वतःला झोकून देत गणेश खोब्रागडे यांनी विविध उपक्रम आणि लोकपरंपरांचे अद्भुत दर्शन साहित्य संमेलनातून अजरामर केले. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले गणेश खोब्रागडे झाडीबोलीचे अभ्यासक असून त्यांचा साहित्य संमेलन आयोजनातील सहभाग आणि साहित्यिक प्रवास यामुळे पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Mul-Zadiboli Sahitya Mandal is conducting various activities to bring out the features of Zadipatti through literature. As a motivational part of this, every year Jadi Yuva Chaitanya award is given to the activists of Jadipatti who have made an incomparable contribution in social, cultural, political and literary fields along with literature.
Like every year, this year the selection committee of Zadiboli Sahitya Mandal has made substantial contribution to Zadiboli conservation and movement. Pt. Member Ganesh Khobragade has been selected for Zaadi Yuva Chaitanya Award.
Village Geetacharya Bandopant Bodhekar, District President Arun Zagadkar, District Women President Prof. Ratnamalatai Bhoyer and District Member Laxman Khobragade did evaluation and examination in the Zadi Yuva Chaitanya Award Selection Committee. Member Ganesh Khobragade will be felicitated by the dignitaries present at the program organized at Gondpipari on 18th September 2022 with a manvastra, a badge of honor and a certificate of appreciation.
Ganesh Khobragade is a youth leader from Junasurla in Mula taluka and with his studious attitude he has worked hard for village development and successfully implemented various schemes. Socially conscious Ganesh Khobragade is doing valuable work of cultivating and preserving cultural heritage through Prahar Sevadharmi Mancha.
Ganesh Khobragde, who is fond of literature, organized the 29th Zadiboli Sahitya Sammelan in his village Junasurla to give a valuable contribution to the field of literature and gave everyone a sense of the world of literature in Panchkroshi. Devoting himself without relying on anyone, Ganesh Khobragade immortalized the wonderful vision of various activities and folk traditions through the Sahitya Sammelan. Ganesh Khobragade, who has a political, social and cultural heritage, is a scholar of the bush language and is widely appreciated and congratulated for his selection for the award due to his participation in organizing the Sahitya Sammelan and his literary journey. is being done.
