News34 chandrapur
वरोरा : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व संघर्ष इमारत बांधकाम संघटना शाखा वरोरा च्या वतीने मोफत आधार कार्ड ला मतदान ओळखपत्र लिंक करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. UID Card link
आजच्या घडीला आधार कार्ड हे सर्वांसाठी अतिशय महत्वाचे झालेले असून आधार कार्डच्या माध्यमातून आपले दैनंदिन कामे तसेच शासकीय कामे चालत असतात.
शासनाने आधार कार्ड हे सर्वच शासकीय कार्यालयामध्ये सक्तीचे केलेले असून ते आपल्या कागदपत्रासोबत लिंक केल्या जात असते. त्याच प्रमाणे शासनाने आता आधार कार्ड हे व्यक्तीच्या मतदान ओळ्खपत्राला लिंक करण्याची मोहीम सुरू केली असून त्यांनी ते सक्तीचे केलेले आहे. याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व संघर्ष इमारत बांधकाम संघटना शाखा वरोरा यांच्या वतिने वरोरा तालुक्यामध्ये बारव्हा, आर्वी, वडगाव, या गावांमध्ये मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले व त्या माध्यमातून एकंदर 937 लोकांची आधार लिंक मतदान ओळ्खपत्राला करण्यात आले. Voter card

यावेळी गावातील प्रमुख नागरिक तसेच वडगाव येथील सरपंच नर्मदाताई बोरेकर, सर्व ग्राम पंचायत सदस्य, माजी उपसभापती पंचायत समिती वरोरा दत्ताभाऊ बोरेकर, विलास कारेकर, संघर्ष इमारत बांधकाम संघटना शाखा वरोरा चे अध्यक्ष अनिल कुमरे, इ.उपस्थित होते. aadhaar link to voter id
यावेळी स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी कळविले की, याप्रकारचे कॅम्प वरोरा व भद्रावती तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावले जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.