News34 chandrapur
चंद्रपूर - निवृत्ती पेन्शन चे केस पेपर महालेखापाल नागपूर यांचेकडे पाठविण्याकरिता जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक गोपाळ उमाजी पेंटेवार यांनी फिर्यादीला 5 हजार रुपयांची मागणी केली, पैसे देण्याची इच्छा नसल्याने याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता आज 13 सप्टेंबरला वरिष्ठ लिपिक पेंटेवार यांना जिल्हा परिषद गेटवर रंगेहात अटक करण्यात आली. Acb trapफिर्यादी हे तळोधी, तालुका चिमूर येथील रहिवासी आहे, ते कनिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले होते, त्यांचा निवृत्ती पेन्शन चा अर्ज माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिला होता. Bribe
मात्र वरिष्ठ लिपिक गोपाळ पेंटेवार यांनी सदर कागदपत्रे पुढे पाठविण्यासाठी फिर्यादीला 5 हजार रुपयांची लाच मागितली. Zilla parishad chandrapur
फिर्यादी यांना स्वतःच्या कामाकरिता लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचत लाचेची तडजोडीअंती रक्कम 4 हजार रुपये स्वीकारताना पेंटेवार यांना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या गेट समोर रंगेहात अटक करण्यात आली. Education department chandrapur
सदर कारवाई लाचलुचपत चंद्रपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात कार्यालयीन स्टाफ रमेश दुपारे, नरेश ननावरे, पुष्पा कोचाळे, वैभव गाडगे, मेघा मोहूर्ले, अमोल सिडाम, रवी ढेंगळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
News34 Chandrapur
Chandrapur - Senior Clerk Gopal Umaji Pentewar working in Education Department in Zilla Parishad demanded 5 thousand rupees from the plaintiff to send the case paper of retirement pension to the Accountant General Nagpur. On September 13, Senior Clerk Pentewar told Zilla Parishad that he did not want to pay. He was arrested red-handed at the gate.
The plaintiff is a resident of Talodhi, Taluka Chimur, retired from the post of Junior Clerk, applied for retirement pension to the Secondary Education Department. Bribe
But senior clerk Gopal Pentewar demanded a bribe of 5 thousand rupees from the plaintiff to forward the said documents.
As the plaintiff did not want to pay bribe for his own work, he lodged a complaint with Chandrapur Anti-Corruption Department.
After verifying the complaint, Pentewar was arrested red-handed in front of the gate of Chandrapur Zilla Parishad when police inspector Shilpa Bharde laid a trap and accepted the compromise amount of 4 thousand rupees.
The operation was successfully carried out by office staff Ramesh Dupare, Naresh Nanavare, Pushpa Kochale, Vaibhav Gadge, Megha Mohurle, Amol Sidam, Ravi Dhengle under the guidance of Deputy Superintendent of Police Avinash Bhamre of Lachluchapat Chandrapur Division under the leadership of Police Inspector Shilpa Bharde.