गुरू गुरनुले
News 34 chandrapur
मुल - आधुनिक भारताचे तंत्रज्ञानाचे जनक, आर्किटेकट दूरसंचार नेटवर्क स्थापनेचे शिल्पकार, व्यावसायिक कौशल्य विकास शिक्षणाचे निर्माते, भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्य मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते स्व.राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले. तसेच कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही राजीव गांधीजींच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन व प्रार्थना केली.
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनूरकर, तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेडीवार, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भूरसे, पंचायत समिती माजी सभापती दशरथ वाकुडकर, सेवा सहकारी सोसायटी केळझरचे अध्यक्ष किशोर घडसे, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ओबीसी सेलचे सरचिटनिस गुरुदास चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, राजगड येथील राजू पाटील मारकवार, ज्येष्ठ कार्यकर्ते माजी प्राचार्य बडूभाऊ गुरनुले, माजी नगरसेवक गुरु गुरनुले, माजी संचालक शांताराम कामडे, शहर कांग्रेस सरचिटणीस सुरेश फुलझेले, माजी संचालक रूमदेव गोहणें, लोकनाथ नरमलवार, रोहित निकुरे, जनार्दन भुरसे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत चटारे, विक्रम गुरनुले, विष्णू सादमवार, अन्वर शेख, यांचेसह ग्रामीण व शहरी कांग्रेस कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. संतोषसिंह रावत यांनी राजीव गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य व विचार ग्रामीण आजच्या युवकांना ,कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यापर्यंत व कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवून ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात गावागावात कांग्रेस संघटन मजबूत करावे असे आव्हान करीत हीच खरी स्व.राजीव गांधींना आदरांजली ठरेल.