News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त तब्बल महिन्याभरानंतर सापडला, मंत्रिमंडळ विस्तारावर अनेक चर्चा झाल्यानंतर 9 ऑगस्ट ला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज राजभवन मुंबई येथे पार पडला.शिंदे गटाचे 9 व भाजपचे 9 असे एकूण 18 आमदारांच्याया छोट्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. Bjp celebrate
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे नेते बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. Maharashtra cabinet expansion
मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच चंद्रपूर भाजपने गांधी चौकात जल्लोष साजरा केला.
माजी महापौर राखी कंचर्लावार, भाजप अध्यक्ष मंगेश गुलवाडे, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, प्रकाश धारणे व भाजप कार्यकर्त्यांनी बँड बाजाच्या तालावर विजय उत्सव साजरा केला. Sudhir mungantiwar
यावेळी माजी महापौर कंचर्लावार यांनी प्रतिक्रिया देताना आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी आनंदाचा दिवस आहे, रखडलेली विकासकामे आता पूर्णत्वास जाणार आहे, आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व आणतील.
यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.