News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच महिण्यात चारदा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची घटना घडली आहे. याला पुर्णपणे वेकोली प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी पावसाळी अधिवेशनात बोलतांना केला असुन वेकोलीच्या मातीमुळे समतळ झालेले नदीपात्र पुन्हा खोलिकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. Mla Kishor Jorgewar
मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील अनेक महत्वांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. ते यावेळी म्हणाले कि, यंदा चंद्रपूरात झालेल्या पावसाचे प्रमाण इतके अधिक होते की, चंद्रपूरची जिवनदाई असलेल्या इरई धरणाचे irai dam water level दरवाजे २८ वेळा उघडल्या गेले. तब्बल ६ हजार ४६ कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले. चंद्रपूरला आलेल्या पुरात २४ पेक्षा अधिक नागरिकांना जिव गमवावा लागला असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. चंद्रपूरात वेकोलीचे जाळे आहे. वेकोलीच्या खानीने खानीमधुन निघत असलेली माती नदी लगत टाकली. त्यामुळे सदर माती नदीत साचल्याने अनेक ठिकाणचे नदीपात्र समतळ झाले आहे. Help the flood victims
आणि हेच या पुराचे मुख्य कारण ठरले असुन या पुराला आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीला वेकोली प्रशासनच जबाबदार असल्याचा पूराव्यानीशी आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केला आहे. आता समतळ झालेले नदीपात्र पुन्हा खोल करण्यासाठी खोलीकरण करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. Maharashtra assembly monsoon session 2022
चंद्रपूरात आलेल्या पुराने शहरालगत असलेल्या बेलसनी, पिपरी, मारडा, विचोडा, वढा या गावामध्ये जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येथे रस्ता आणि पुलाचे निर्माण करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन पावसामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना भरिव मदत द्यावी असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
4 times flood in Chandrapur in one month
ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि आदिवासी विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलत असतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, पुर्व विदर्भात पुर परिस्थिती नंतर मोठी जबाबदारी ग्रामविकास विभागावर आहे.
सततच्या पावसामूळे चंद्रपूरातील शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळांच्या इमरती शतीग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी बसु शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. चंद्रपूरमध्ये आदिवासी विभागाचे जात पडताळणी कार्यालय देण्यात आले आहे. मात्र नविन इमारत आणि आवश्यक कर्मचारी देण्याची आवश्यकता आहे. ही व्यवस्था येथे नसल्याने येथील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जावे लागते. त्यामूळे मंजुर झाले असलेल्या जात पडताळणी कार्यालयात कर्मचा-र्यांची नियुक्त करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.