News 34 chandrapur
चंद्रपूर - विद्यार्थ्यांनी टिळकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा असे प्रतिपादन सौ. राधिका फडके पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या आपण जसा पालकांकडे हट्ट करतो त्याचप्रमाणे या अमृत महोत्सवी वर्षात पालकांनी बुस्टर डोज booster dose घ्यावा आणि घरोघरी तिरंगा मोहिमे अंतर्गत आपल्या घरीही तिरंगा फडकविण्याचा हट्ट करावा. LTV Schoolलोकमान्य टिळक स्मारक मंडळा द्वारा संचालित चारही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या . या कार्यामाच्या अध्यक्ष आणि लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष अॅड् . रवींद्रजी भागवत आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की "विद्यार्थ्यांनी साकारात्मकता अंगी बाळगावी . त्याचप्रमाणे आपले ध्येय गाठण्यासाठी निरंतर व प्रामाणिक प्रयत्नांची कास धरावी.
संधीचा योग्य उपयोग करून सतत प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी तीनही शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष अॅड् . रवींद्रजी भागवत, प्रमुख अतिथी सौ. राधिका फडके तसेच मंडळाचे उपाध्यक्ष अॅड् . श्री. प्रशांतजी घट्टूवार , सचिव श्री. गांगेयजी सराफ विराजमान होते. या कार्यक्रमास मंडळाचे सहसचिव डॉ. राम भारत , कोषाध्यक्ष अरुणजी मदनकर कार्यकारिणी सदस्य श्री. दत्तप्रसन्नजी महादाणी , डॉ. प्रवीण पंत , अॅड्.अभयजी पाचपोर , सभासद सौ. वनमाला धानोरकर , माजी मुख्याध्यापिका सौ. जया भारत , सौ. मंगला श्रीरामे , माजी मुख्याध्यापक श्री. नीलकंठ कावडकर , श्री. वसंतजी थोटे . त्याचप्रमाणे तीनही विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उप मुख्याध्यापिका पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव श्री. गांगेयजी सराफ यांनी केले तर उपाध्यक्ष श्री. प्रशांतजी घट्टूवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु.आकांक्षा टेकाम हिने केले तर कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.