News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी 28 ऑगस्टला विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत मंथन हॉल येथे आढावा बैठक पार पडली.सदर बैठकीत डॉ. छेरिंग दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची सदर बैठकीला उपस्थिती होती. Ganeshotsav 2022
जिल्ह्यातील गणेशोत्सव आगमन व विसर्जन काळात पोलिसांनी सजग राहून कोणतीही अनुचित घटना घडू नये यावर लक्ष ठेवून राहावे. Chandrapur police
असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दोरजे यांनी दिले, पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीची बैठक घेत सर्व सदस्यांना गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी नागरिकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी करायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष म्हणजे यंदा स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यातील भागात दौरा करीत गणेशोत्सवाचा आढावा घेत आहे.