News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल जि. चंद्रपूर च्या ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एस. आर रंगनाथन जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके मॅडम तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रा. प्रविण उपरे सर, प्रा. दिनेश बनकर, राष्ट्रीय सेवा आयोगाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मांडवगडे तसेच ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. विभावरी हाते होते. सर्वप्रथम डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. हाते मॅडमनी प्रास्ताविक भाषणात डॉ. रंगनाथन यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला तसेच त्यांनी ग्रंथालयाची पाच सुत्र याबद्दल विस्तृत चर्चा केली. प्रा उपरे यांनी मोबाईल ग्रंथालय म्हणजे तुम्ही जर मोबाईल वर अॅप डाउनलोड केले तर तुम्हाला ग्रंथाबद्दल वर्तमान पत्र देखील मोबाईल वर वाचता येईल मोबाईलवरच बरेचसे पुस्तके वाचायला मिळतील. तर प्रा दिनेश बनकर यांनी ग्रंथालयामध्ये जावून ज्ञान आत्मसात करावे, महान पुरुषांची आत्मचरित्र वाचले पाहिजे तसेच प्रा. सेलेकर यांनी सांगीतले की ग्रंथालयामध्ये कोलण किंवा डेसीमल पध्दतीने ग्रंथाची रचना केलेली असते त्यानुसार वाचकाला ग्रंथ लवकरात लवकर मिळतो. तसेच डॉ. संदीप मांडवगडे जसे आपण सौंदर्य टिकवण्यासाठी प्रयत्न करतो तसेच, अंर्तमन सुध्दा चांगले ज्ञान घेवून तयार करावे "वाचाल तर वाचाल” या म्हणीप्रमाणे वागावे. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांनी वर्गामध्ये किंवा कार्यक्रमाला शिस्तीने विशिष्ट रांगेत बसायला पाहिजे तसेच ग्रंथाचे आमपरिक्षण करणे कारण ते अंतिम क्षणापर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. स्पर्धेच्या युगात वाचन हे आवश्यक आहे कारण वाचन केलेले वेगवेगळ्या विषयावरील ज्ञान शेवटच्या श्वासापर्यंत राहते. कार्यक्रमाचे संचालन 12 वी कामर्सचा विद्यार्थी अविनाश चहारे तर आभार वैभव मोहुर्ले यांनी केले कार्यक्रमाला प्रा.मासीरकर प्रा. सिकंदर लेनगुरे , वैद्य सर, इतर सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी विद्यार्थीनी ग्रंथालयीन सेवक वर्गामध्ये पंकज खंगार व गणेश सोनकुसरे यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.