News 34 chandrapur
चंद्रपूर - नवीन चंद्रपूर येथील 53 कोटींच्या मल निस्सारण गटार वाहिनीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, म्हाडा चे अध्यक्ष, नागपूर गृह निर्माण चे मुख्य अधिकारी यांना केली.बेले यांच्या तक्रारींवर प्रशासनाने चौकशी समिती गठीत करण्यात आली होती मात्र त्यासाठी त्यांना अन्नत्याग आंदोलन करावे लागले होते.
राजेश बेले यांना चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करून अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करावी व सदर भ्रष्टाचाराची चौकशी शासकीय अभियांत्रिकी विद्यालय/VNIT मार्फत करावी अशी मागणी केली होती. Corruption mhada
प्रशासनाच्या चौकशी अहवालात फक्त त्रुट्यांचा उल्लेख केला गेला असून त्यामध्ये कंत्राटदार M/S eagal infra india ltd. कंपनी यांना काळ्या यादीत टाकावे असा कुठलाही उल्लेख नव्हता.
सदर अहवालाच्या विरोधात राजेश बेले उच्च न्यायालयात दाद मागणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत राजेश बेले यांनी दिली.