News34 chandrapur
चंद्रपूर/घुग्गुस - शहरातील अमराई वार्डात आज एक भयानक घटना घडली, वार्डातील गज्जू मडावी हे कुटुंबासाहित घरी असताना अचानक घराच्या आत एक लहान गड्डा पडला, आणि हळूहळू त्या गड्ड्याचा आकार मोठा झाला. Landslideकाही भयानक होणार हे कळताच गज्जू आपल्या कुटुंबासाहित घराबाहेर निघाला आणि एका क्षणात घर अक्षरशः जमिनीच्या आत कोसळले.
सदर बाब वाऱ्यासारखी शहरात पसरली, वेकोलीचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पोलीसही अमराई भागात दाखल झाली.
इंग्रजांच्या काळात घुग्गुस येथे रोबर्टसन इन्कलाईन खान होती, देश स्वतंत्र झाल्यावर 1981 ला त्या खाणीला ओपणकास्ट मध्ये परावर्तित करण्यात आले. Coal india
खुल्या खदाणीतून कोळशाचे उत्खनन करण्यात आले होते, त्यावेळी शहराचा विस्तार ही वाढला, नागरिकांनी खाणी च्या जवळ घरे बांधली.
आजच्या स्थितीत संपूर्ण घुग्गुस शहर हे अंडरग्राऊंड खाणीच्या वर वसलेले आहे. Black gold city
घटना ज्यावेळी घडली व त्यानंतर अमराई वार्डात कंपन सुरू होते, जणू काय परिसरात भूकंपाचे झटके आले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. Earthquake
सध्या मोठी दुर्घटना घडू नये यासाठी अमराई वार्ड खाली करीत तिथे राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
The house collapsed
सदर माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार घटनास्थळी दाखल झाले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. यावेळी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मडावी यांचे अर्ध्यापेक्षा जास्त घर या घटनेत खड्यात गेले आहे. पाहणी दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी जवळपासचा परिसर खाली करण्याचे निर्देश प्रशासनाला केले आहे. सदर नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. परिसर खाली झाल्यावर येथे चोरी सारख्या घटना घडु शकतात त्यामूळे येथे पोलिस उपलब्ध करुन देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी पोलिस निरिक्षकांना दिले आहे. Western coalfields limited
सदर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी महावितरण विभागाला केल्या आहे. सदर घटनेची माहिती वेकोलीचे वणी एरियाचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांना दिली आहे. वेकोलीनेही त्यांच्या सुरक्षा रक्षक व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला येथे तात्काळ पाचारन करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. घर खड्ड्यात गेल्याने आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबाचीही आ. जोरगेवार यांनी भेट घेतली असून पिडीत कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या आहेत. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते इमरान शेख, स्वप्नील वाढई, अबरार शेख आदींची उपस्थिती होती.
चंद्रपुर शहरात नुकतेच लालपेठ भागातील कोळसा खाणीचा विस्तार होत असून परिसरातील घरे हटविण्यात येणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यात ज्याठिकाणी कोळशाच्या खाणी आहे त्या परिसरातील घरे वेकोलीने मोठी घटना व्हायच्या आधी हटवावे.


