News 34 chandrapur
चंद्रपूर - सैनिकी प्रशिक्षणामुळे तरुणांमध्ये सद्भावना, शिस्त, आज्ञाधारकपणा, स्वावलंबन, स्वाभिमान, स्वभाव इत्यादींचा विकास होतो. यातुनच देशरक्षा करणारा सैनिक घडत असतो. बलिदानातुन मिळालेले स्वातंत्र्य आबादीत ठेवण्यासाठी सैनिकांची गरज आहे. Chandrapur military school
Soldier यासाठी सैनिक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. याच सैनिक शाळेतुन देशाला भविष्यातील शुर सैनिक मिळेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Flag hosting chandrapur
Soldier यासाठी सैनिक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. याच सैनिक शाळेतुन देशाला भविष्यातील शुर सैनिक मिळेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Flag hosting chandrapur
आज स्वातंत्र्य दिना निमित्त सन्मित्र सैनिक विद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कमांडर सुरिंदरकुमार राणा, प्राचार्य अरुंधती कावडकर, सन्मित्र मंडळाचे सहसचिव विजयराव वैद्य, नितीन कुम्मरवार, जेसीवो शिक्षण निर्देशक कमलसिंह थापा, प्रा. श्याम हेडाऊ आदिंची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती होती. independence day 2022
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. विविधतेत नटलेला भारत देश स्वातंत्र्य सैनिकांच्या अमुल्य बलिदानाने आज स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. त्यांनी त्याकाळी केलेल्या त्यागामुळेच आपण आज स्वतंत्र देशात जगत आहोत. आपल्याला आता कोणाचीही बंधन नाहीत. कोणाच्याही अधिपत्याखाली आपला भारत देश नाही. आज आपला देश ताठ मानेने जगाचे नेतृत्व करण्यासाठी उभा आहे. मात्र बलिदानातुन मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवुन देशाला महासत्ता बनविण्यासाठी आपल्यातील सैनिकवृत्ती जागविण्याची गरज आहे. यासाठी सैनिक शाळांची महत्वाची भुमिका असनार असुन सैनिक प्रशिक्षण हि काळाची मोठी गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले. विद्यार्थी जिवन हे मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे. याच काळात विद्यार्थ्यांवर त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम संस्कार होत असते. देशसेवा करण्याचे अनेक माध्यम आहेत. मात्र सैनिक शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी देशसेवे सोबतच देश रक्षणासाठी समर्पीत असतो. देश पारतंत्र्यात होता तेव्हा सैनिक प्रशिक्षणाची सक्ती नव्हती. पण आज भारत स्वतंत्र आहे. या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता देशवासीयांवर आहे. शेजारच्या देशांकडून हल्ल्याची सतत भीती असते. त्यामुळे भारतात सैनिकी प्रशिक्षण घेणे आवश्यक झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गाण्यात आले. यावेळी सैनिकी प्रशिक्षण घेत असलेल्या विध्यार्थांची उपस्थिती होती
