News 34 chandrapur
चंद्रपूर - युवासेना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने शिष्टमंडळाने gondwana university गोंडवाना विद्यापिठ कुलगुरू मा.प्रशांत बोकारे यांची भेट घेतली.यावेळी चंद्रपूर गडचिरोली गोंडवाना विद्यापिठामार्फत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात, कार्यक्रम राबविण्यात येतात याबाबत कुलगुरू यांनी माहिती दिली.
यावेळी युवक- विद्यार्थ्याच्या विविध समस्या, भविष्यात कुठल्या चांगल्या शैक्षणिक योजना,उपक्रम घेऊ शकतो, विद्यार्थी समस्या, प्रश्नासंदर्भात कुलगुरू व युवासेना पदाधिकारी यांच्या मध्ये सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेत युवासेनेचे प्रा. निलेश बेलखेडे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा विषय केंद्रस्थानी ठेवून चांगल्या अभ्यासक्रमासोबतचं रोजगार, नौकरी संदर्भात विविध कंपन्या, संस्था सोबत MOU करून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी विद्यापिठाने पुढाकार घेतल्यास बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी हा जिल्ह्यातच शिक्षण घेण्यास प्राधान्य देईल व दर्जेदार शिक्षणासोबतच नोकरी देणारे विद्यापीठ अशी वेगळी ओळख विद्यापीठाची होईल असे विचार मांडले. युवासेनेच्या शिष्टमंडळाने विविध प्रकारच्या अभ्यासक्रम ग्रामीण भागातील शेवटच्या विद्यार्थ्यांना माहीती मिळाली याकरिता विविध तालुका स्तरावर विद्यापीठाने कार्यक्रम आयोजित करावी जेणेकरून या अभ्यासक्रमात गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल असे विचार मांडले व याकरिता युवासेना विद्यापीठाला मदत करण्यासाठी तयार राहील अशीही ग्वाही यावेळी दिली.यावेळी कुलगुरू साहेब यांनी चांगला प्रतिसाद दिला व आपण विद्यार्थ्यांच्या हिताकरीता कट्टीबद्ध असून नक्कीच दिलेल्या चांगल्या सुचना अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी भावना व्यक्त केली व सहकार्य करीत राहील असे सांगितले.
Yuvasena news
Yuvasena news
यावेळी युवासेना शिष्टमंडळात युवासेना जिल्हा चिटणीस विनय धोबे, सुरज घोंगे,राजूरा तालुका चिटणीस तथा उपसरपंच कुनाल कुडे, युवासेना शहर प्रमुख इंजि.चेतन बोबडे, बल्लारपूर शहर प्रमुख इंजि.श्री बुटले, शहर समन्वयक करन वैरागडे, युवासेना तालुका चिटणीस वतन मादर, उपशहर प्रमुख प्रफुल्ल चावरे, सोनु चावरे,दर्शन कोहळे यांची उपस्थिती होती.