News 34 chandrapur
चंद्रपूर - सध्या देशात समाजमाध्यमांचा चांगलाच बोलबाला आहे, या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकत आपल्या कला गुणाना वाव देण्याचे काम करीत आहे.आता तर Youtube द्वारे अनेक Creators short films च्या माध्यमातून प्रेक्षकांना काही नवीन story देण्याचा प्रयत्न करीत आहे.
असाच एक प्रयत्न चंद्रपुरातील काही युवकांनी केला आहे.
ZK Studio नामक Youtube Channel बनवीत त्यावर अनेक video album बनविण्यात आले आहे, चंद्रपुरातील जहिर काजी यांनी या channel चं निर्माण केलं आहे.
नुकताच चंद्रपुरातील कलाकारांनी व Zk studio यांनी मिळून मानव तस्करी human trafficking वर "छोटी मेरी प्यारी बहना" नामक शॉर्टस फिल्म्स चे निर्माण केले आहे.
20 ऑगस्टला सदर चित्रपट youtube वरील zk studio channel वर released करण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 10 वर्षीय जीविका पोनलवार, महेश बावणे, बिरबल रॉय व जय यादव यांनी अभिनय केला असून चित्रपटाची निर्मिती आलिया खान यांनी तर दिग्दर्शन जहिर काजी यांनी केले आहे.
सदर चित्रपट चंद्रपुरातील अनेक भागात शूट केला असून फक्त 20 दिवसात हा चित्रपट तयार झाला आहे.
नागरिकानो तर मग Youtube वरील zk studio या channel वर जाऊन सदर चित्रपट मोफत बघून चंद्रपुरातील कलाकारांचे प्रोत्साहन आपण या माध्यमातून वाढवावे असे आवाहन जहिर काजी यांनी केले आहे.