News34 chandrapur
चंद्रपूर - दिल्ली येथील सिल्व्हरझोन फाऊंडेशन द्वारा दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलंपियड स्पर्धा विविध विषयांत घेण्यात येते. या स्पर्धेत भारताशिवाय चीन, जपान, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कतर, सऊदी अरब, केनिया, घाना, बहरीन, रशियन फेडरेशन, संयुक्त अरब अमिरात इ. Arab Emirates देशातील विद्यार्थी सहभागी होतात. सर्व शाळांमधील विद्यार्थी आपल्या इयत्तेनुसार यात सहभाग दर्शवितात.
International Olympiad Competition
International Olympiad Competition
चंद्रपूर येथील माऊंट कारमेल काॅन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी व प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ दिपक भट्टाचार्य व ॲडव्होकेट अर्चना भट्टाचार्य यांची ज्येष्ठ कन्या कु.अर्चिता हिने 2021 यावर्षी विज्ञान व गणित या विषयात चवथ्या वर्गातून या स्पर्धेत भाग घेतला. तिने विज्ञान या विषयात शाळेतुन प्रथम येऊन सुवर्ण पदक संपादन केले व गणित या विषयात शाळेतुन प्रथम तर आलीच पण आंतरराष्ट्रीय तिसरा क्रमांक प्राप्त करून आंतरराष्ट्रीय कांस्यपदक पटकावले. पदक एवं प्रशस्तीपत्रकाशिवाय तिला पाचशे रुपये पुरस्कार स्वरूप प्राप्त झाले. नुकतेच एका छोटेखानी कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर नित्या यांच्या हस्ते तिला पदक, प्रमाणपत्र तसेच पाचशे रुपयाचे धनादेश देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण चंद्रपूरकरांसाठी अभिमानास्पद केलेल्या कामगिरीच्या यशाचे श्रेय तिने आपल्या आई एवं आजीस दिले व भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्याचा मानस व्यक्त केला.