News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे बुध्दिबळ व बैडमिंटन च्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धाचे आयोजन दिनांक 5 ते 7 ऑगस्ट, 2022 दरम्यान करण्यात आले होते. सदर स्पर्धेत कृषी महाविद्यालय मुल (सोमनाथ) येथील मुले आणि मुलीचे स्वतंत्र संघ सहभागी झाले होते.
बुद्धिबळ chase संघात एकुण 32 संघ सहभागी झाले होते त्यामधून कृषी महाविद्यालय मुल च्या संघाने व्दितीय क्रमांक: पटकावला. यावेळी अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात संघातील खेळाडू श्री नयन डामपल्लीवार, साई केन्द्रे कृष्णा काकड, शुभम ढगे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत एकूण 17 संघ सहभागी झाले होते.
कृषी महाविद्यालय, मुल (सोमनाथ) हे दुर्गम भागात कार्यरत असून तसेच नविन महाविद्यालय असल्यामुळे खेळाच्या पुरेश्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत याही परिस्थितीत महाविद्यालयातील व्दितीय वर्षाच्या विद्यार्थीनी कु. तृजा मुनः साक्षी भटटड, वैष्णवी झाडे यांनी प्रथम प्रयत्नात उपांत्य फेरीत धडक मारली व अटीतटीच्या सामन्यात संयुक्तपणे 3 रा क्रमांक पटकावला कृषी महाविद्यालय, मुल येथील विद्यार्थ्यांनी प्रथमच आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरावरील आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि प्रतिकुल परिस्थितीत मिळविलेल्या यशाचे विद्यापीठातील आयोजन समितीने कौतुक केले.
Inter college competition
सदर स्पर्धेत सहभागी विद्यार्थाना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळ डॉ. रमाकांत गजभिये, डॉ शैलेश सरनाईक संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक तसेच डॉ. राहूल चहांदे, प्रभारी खेळ याना दिले. लवकरच महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात येईल असे डॉ विष्णुकांत टेकाळे, सहयोगी अधिष्ठाता यांनी सांगितले.
आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत पुढील काही दिवसात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कब्बडी, खो खो, क्रिकेट cricket, फुटबॉल, अविष्कार, युथ फेस्टीवल चे आयोजन विविध ठिकाणी करण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाविद्यालातील विद्यार्थी चांगल्या पध्दतीने क्रीडा संकुल, मुल येथील क्रीडांगणात सराव करीत आहेत महाविद्यालयातील डॉ. सुमेध काशीवार, डॉ. विजय राऊत, डॉ. कांचन जीवतोडे, डॉ. दिनेश नवलकर हे विद्यार्थ्यांना दैनंदिन सरावावर विशेष लक्ष ठेवून आहेत व येणा-या काळात होणा-या विविध स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी भरघोस यश मिळवतील असा विश्वास कृषी महाविद्यालय, मुले (सोमनाथ) चे डॉ. विष्णुकांत टेकाळे सहयोगी अधिष्ठाता यांनी व्यक्त केला.