News 34 chandrapur
चंद्रपूर - मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे, नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.
नदीचा प्रवाह बघण्यासाठी नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करीत असून ही गर्दी एका इसमाचा तरी जीवावर बेतणारी ठरली आहे. Chandrapur flood
लालपेठ येथील माता नगर वार्ड निवासी 38 वर्षीय भाजीपाला विक्रेता विशाल देविदास समर्थ हा 10 ऑगस्ट पासून बेपत्ता होता यासंदर्भात महाकाली पोलीस चौकी येथे तक्रार करण्यात आली होती.
पोलिसांनी तपास केला असता विशाल समर्थ हा पठाणपुरा गेट बाहेरील मनपा वॉटर ट्रीटमेंट प्लांट जवळील
जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याचा प्रवाह थांबला आहे.
त्याठिकाणी चौकशी केली असता विशाल यांची चप्पल आढळून आली, पोलिसांनी विशाल ची शोधमोहीम सुरू केली, काही वेळानी आपत्ती व्यवस्थापन चमू ला बोलाविण्यात आले.
मात्र अजूनही विशाल चा पत्ता लागला नाही.
सध्या पोउपनी विजय मुक्के, दीपक चालूरकर, गुगले, संजय ढोरे अधिक तपास करीत आहे.

