News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील काही महिन्यांपासून शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या घटनेत वाढ झाली होती, मात्र घरफोडीच्या घटनेवर रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला गती देत आरोपीना अटक केली.आता चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 24 जुलै ला पठाणपुरा निवासी सुनील चिप्पावार हे कुटुंबासाहित शिर्डीला गेले होते, 27 जुलै ला चिप्पावार यांच्या नातेवाईकांनी सम्पर्क करीत घरातील दरवाजा उघडा आहे अशी माहिती दिली. Burglary case
चिप्पावार ज्यावेळी घरी आले तेव्हा घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीमध्ये होते, चिप्पावार यांनी घरातील कपाट बघितले असता त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी गेली असल्याचे निदर्शनास आले.
चिप्पावार यांच्या घरून तब्बल 94 हजार रुपयांचा माल चोरी गेली असल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. Crime news
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी तपास सुरू केला असता मुखबिर च्या खबरेवरून तनविर बेग, आरिफ शेख व सूरज कुकडेलवार यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
गुन्ह्यात चोरी गेलेले सोनं व रोख रक्कम आरोपी कडून जप्त करण्यात आली.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात सपोनि जयप्रकाश निर्मल, शरीफ शेख, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गजलवार, सचिन बोरकर,इम्रान खान, रुपेश रणदिवे यांनी कारवाई यशस्वीपणे पार पाडली.