News 34 chandrapur
गोंडपीपरी - मुलगा तापाने फणफणत होता.गावात आरोग्य सूविधा नाही.नदी,नाल्यांना पुर.मात्र बाप तो बापच.मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला. पुराततून पायी मार्ग काढीत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला.
या जिगरबाज बापाचे नाव आहे, श्यामराव पत्रूजी गिनघरे तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहीवासी आहे. Heavy rain chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सूरू आहे.यामुळं वर्धा,वैनगंगा नदीला पुर आला. महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसले आहे. Flood
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे.गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांच्या मुलगा कार्तिक याला ताप आला. Child Treatment
तापाने तो फणफणत होता. गावात आरोग्य सूविधा नाही. दुसरीकडे दुसऱ्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले. मात्र बाप तो बाप.मुलाचा ताप काळजी वाढविणारा ठरला.पोडसा गावापासून पाच ते सहा कि.मी. अंतरावर वेडगाव गाव आहे.येथे खाजगी डाॕक्टर आहेत. मुलाला खांद्यावर वर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढीत गेला.मुलावर उपचार केला अन परत पुरातून मार्ग काढीत गावाकडे गेला.

