News 34 chandrapur
चंद्रपूर- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर बिहार राज्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर दिनांक 28 रोजी दिल्लीहून रवाना होत आहेत.
भाजपा पक्षश्रेष्टींच्या सुचनेनुसार दि. 28 ते 31 जुलै पर्यंत बिहार राज्यातील अनेक विधानसभा क्षेत्रामध्ये आयोजित या संपर्क दौन्यादरम्यान हंसराज अहीर संघटनात्मक बांधणीसाठी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ समित्या तसेच भाजपाच्या विविध आघाडी प्रमुखांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील, बैठकी व कार्यकमाच्या माध्यमातुन अहीर बिहार राज्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Bjp high commands
बिहार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाने केंद्रीय कार्यकारीणीच्या विविध मोर्चाच्या प्रमुख पदाधिकान्यांना बिहार राज्यात दौरे करण्याचे पक्षश्रेष्ठींनी निर्देश दिले असून संघटनात्मक कार्यात प्रभावी कार्य करणारे, अनुभवी नेतृत्व असलेल्या हंसराज अहीर यांचा हा बिहार दौरा या अनुषंगाने महत्वपुर्ण मानल्या जात आहे. दि. 28 व 29 जुलै रोजी हंसराज अहीर विविध विधानसभा क्षेत्रात दौरा करणार असुन दि. 30 व 31 जुलै रोजी पटना येथे होत असलेल्या सर्व भाजपा मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.