News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - :- शहरातील नगरपंचायत सिंदेवाही- लोनवाही मधिल प्रभाग क्र.-२ येथील विनायक नगर मध्ये येणाऱ्या - जाणाऱ्या मार्गावरील दिशेने रस्त्याची अक्षरशाह चाळणी सारखी अवस्था झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रस्ता शोधणे अवघड झाले आहे.
खड्यात पाणी साचल्या मुळे पायी चालणाऱ्या माणसांना सुद्धा चालणे अवघड झाले आहे. Pits on the road
खड्यात पाणी साचल्या मुळे पायी चालणाऱ्या माणसांना सुद्धा चालणे अवघड झाले आहे. Pits on the road
या रस्ताने टू व्हीलर, थ्री व्हीलर, इत्यादी अनेक वाहणाची येने-जाने असते. परंतु चार चाकी वाहणास चालवणाऱ्यांना तर तारेवरची कसरत केल्या सारखे जाणवत असेल कारण की खड्डे भरपूर झाल्या मुळे कोणता खड्डा चुकवावा हे समजण्यास अवघड बनले असून या रोड मुळे अक्षरशः नगरपंचायत प्रभाग क्र.2 मधिल विनायक नगरातील नागरिकांना नाहक असा त्रास सहन करावे लागत आहे.
याकडे सिंदेवाही नगर प्रशासन कधी लक्ष देणार आहे का? असा प्रश्न प्रभाग क्र.2 मधिल विनायक नगर येथील शहरातील शांत, समजदार,संयमी, नागरीकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.