News 34 chandrapur
वरोरा - स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या वायगाव भोयर येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर वीज पडून मरण पावल्याची घटना घडली.
आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोर धार मुसळधार पावसाने हजेरी लावून पाण्यासह मेघ गर्जना सह वीज गर्जना सह जोरदार हजेरी लावली यात शेतात काम करीत असताना एकाएकी हवामान बदलल्याने घराकडे निघत असताना अचानक महिलांवर विजेचा कोसळली, विजेच्या धक्क्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला. यात हिरावती शालिक झाडे वय ४५ वर्ष राहणार वायगाव भोयर माजी पंचायत समिती वरोरा सदस्य, पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष राहणार वायगाव, मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष राहणार वायगाव, रीना नामदेव गजभे वय वर्ष २० वर्ष राहणार वायगाव भोयर अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला दोन मुली याचा मृत्यू झाला असल्याने गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाली आहे. करिता या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी केली आहे. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे psi प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे.