News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात 8 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने चंद्रपूर शहरातील नगिनाबाग, रहमतनगर व सिस्टर कॉलनी भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले.
नागरिकांनी स्वतःचा बचाव करीत सुरक्षित ठिकाणी निघून गेले, मात्र पुरात चोर जेव्हा घरात आले त्यावेळी हजारोंच्या मुद्देमालावर हात साफ करून गेले.
शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले, एक-दोन दिवसात पाणी उतरणार अशी नागरिकांना आशा होती मात्र तसे काही झाले नाही. Flood chandrapur
या पुराचा फायदा घेत सिस्टर कॉलनी येथील प्रतीक आवळे यांच्या घरी पाणी शिरल्याने ते नातेवाईकांकडे रहायला गेले होते. burglary
या गोष्टीचा फायदा घेत चोरांनी घरात प्रवेश करीत हजारोंच्या मुद्देमालावर हात साफ केला.
सदर घरफोडीत रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ रोनी व विधी संघर्ष बालकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. Flood theft
आरोपी जवळील मुद्देमाल जप्त करीत पुढील कारवाईसाठी रामनगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. Lcb chandrapur
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप कापडे, सपोनि जितेंद्र बोबडे, संतोष येलपुलवार, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे, गोपाल आतकुलवार, कुंदन बावरी यांनी पार पाडली.