News 34 chandrapur
चंद्रपूर - पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सतत प्रयत्नामुळे अखेर मुंबई-बल्लारशा-मुंबई (ट्रेन नं. ०११२७/०११२८) साप्ताहिक superfast tarin सुपरफास्ट ट्रेन ५ जुलै पासून सुरू झाली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना थेट मुंबईला जाण्याकरीता मोठी सोय होणार आहे.
कोरोना काळापासून मुंबईला जाण्याकरीता थेट रेल्वे गाडी आजपर्यंत सुरू न झाल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच सामान्य रेल्वे प्रवाशांना नागपूर किंवा वर्धा येथे जात मुंबई करीता प्रवास करावा लागत होता. या नव्याने सुरू होत असलेल्या रेल्वेगाडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व अन्यत्र प्रवाशांना मोठी सोय झाली आहे.

Weekly train
आज ही रेल्वे चंद्रपूर स्थानकावर पोहचताच रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी चालकांचे स्वागत केले, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सततच्या पाठपुराव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबई प्रवास करता येणार आहे. Ballarpur to Mumbai
सध्या ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकावरून सुटत आहे, लवकर ही रेल्वे CSMT येथून सुरू व्हावी यासाठी अहिर प्रयत्नरत आहे.
Hansraj ahir
चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री - रमणिकभाई चव्हाण, दामोधर मंत्री, डॉ. भुपेश
भलमे, डॉ. सुशिल मुंधडा, महाविर मंत्री, प्रभाकर मंत्री, सुनिल भट्टड, रमेश बोथरा, रमाकांत देवडा, अनिश दिक्षीत,जगदिश जाधवाणी, नरेश लेखवाणी, प्रदिप माहेश्वरी, संजय मंघानी, आशिष मुंधडा, अशोक रोहरा, राजेश सादराणी,शाम सारडा, प्रल्हाद शर्मा, नरेंद्र सोनी, पुनम तिवारी, प्रमोद त्रिवेदी आदिनी सदर गाडी सुरू केल्याबद्दल हंसराज अहीर यांचे आभार मानून त्यांचे या लोकाभिमुख कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.