News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची अविनाश ठाकरे अध्यक्ष माळी महासंघ याच्या नेतृत्वात काल नागपूर येथे भेट घेऊन माळी समाजाला येत्या मंत्रीमंडळात दोन मंत्री पद, दोन महामंडळ व राज्यपाल नियुक्त आमदारांमधे विदर्भातील माळी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच आरक्षण संबंधी बैठक घेतल्याबद्दल अभीनंदन देखील करण्यात आले.
२०१४ मधे भाजपाची सत्ता आली असतांना माळी समाजाला घटकेचे मंत्रीपद व महामंडळ देण्यात आले यामुळे माळी समाजामधे नाराजी पसरली होती. विदर्भातील लोकसंखेमधे माळी समाज हा १६ टक्के असुन देखील भाजपा तर्फे माळी समाजाला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आले त्याचा फटका २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला बसला. पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व विधीमंडळात नसल्याने विधान परीषदेत त्यांना विधानपरीषदेत मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्यात आले असा प्रतिवाद भाजपा तर्फे करण्यात येतो कोणत्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळाले तरी माळी महासंघाला आनंदच आहे परंतु मग हाच न्याय विदर्भात माळी समाजा करीता का लावण्यात आला नाहि असा प्रश्न माळी समाजातर्फे विचारला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून माळी महासंघ च्या निवेदनाचा विचार भाजपाने करून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश माळी महासंघ द्वारा भाजपा नेते नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली. उपमुख्यमंत्री पदभार स्विकारल्या नंतर पहिल्यादाच नागपूर ला आले असल्याने अतिशय व्यस्त असुन देखील त्यांनी आपला बहुमुल्य वेळ माळी महासंघ पदाधिकाऱ्यांना दिला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकुन सकारात्मक प्रतिसाद दिल्या बद्दल माळी महासंघ तर्फे देवेंद्र फडणविस यांचे आभार राष्ट्रीय सरचिटणीस रविंद्र अंबाडकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अरूण तिखे व महासचिव प्रा. नानासाहेब कांडलकर यांनी मानले. Devendra fadanvis
या प्रसंगी माळी महासंघ चे श्रीकृष्ण गोरडे, राजेश जावरकर, संजय बोरोडे, प्रदीप लांडे, निळकंठ बोरोळे, नितीन टाकरखेडे, सदाशीव विठाले, शंकर चौधरी, प्रमोद हत्ती, गौरव निमकर, किशोर मदनकर, रविंद्र ढोकणे, प्रशांत नगरकर, सौ.अंजुताई ईरले सह प्रदेश व विदर्भातील पदाधिकारी ऊपस्थित होते. माळी महासंघाने केलेल्या मागणीला सर्व महानगर, शहर, जिल्हा,तालुका व ग्रामीण स्तरातील माळी महासंघाच्या मागणीला संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला युवक यांनी दुजोरा दिला आहे.