News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - तालुक्यातील दहेगांव येथील शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतात रोवणीचे काम करीत असताना श्री.विलास रामुजी आलाम या शेतकऱ्यांच्या अंगावर दुपारी 1 वाजता दरम्यान कडाडून विज पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना दहेगांव शेतशिवारात घडली.
Lightning
मूल तालुक्यातील मौजा दहेगांव येथील विलास रामुजी आलाम वय 42 वर्षे यांचे नावाने चक दहेगाव शेतशिवारामध्ये शेती आहे. तो शेतात जावुन शेतकाम करीत असताना आज 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला, याचवेळी विलास आलाम यांच्यावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला, त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुटुंबातील शेती काम करणारा गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबात आई वडील,पत्नी एक मुलगा,मुलगी असा परिवार असल्याने निराधार झाला आहे. घटनेची माहिती पोलिस व महसूल विभागाला माहित होताच पोलीस अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून विलास यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.