News 34 chandrapur
चंद्रपूर - राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन मेडिकोज असोसिएशन, चंद्रपूर द्वारा आयोजित कृतज्ञता सोहळ्यामध्ये बोलताना शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी डॉ.अभिलाषा गावतुरे सतत समाजासाठी चांगले उपक्रम राबवित असतात, आपण अश्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांना थेट संसदेत पाठवून तळागाळातील समस्या सोडविल्या पाहिजे असे उदगार काढले.
रविवार दिनांक 3 जुलै 2022 रोजी बहुजन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर यांच्याकडून स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती भव्य दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. अभिलाषा गावतुरे होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी समाजाचा बुद्धिजीवी वर्ग असलेल्या डॉक्टर लोकांनी आयोजित केलेल्या सोहळ्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि डॉक्टरांसारख्या बुद्धिजीवी वर्गांनी आपल्या खांद्यावर समाजाला प्रगतीपथावर नेण्याची धुरा घेतलेली आहे. आणि या बुद्धिजीवी वर्गाने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात ते सामाजिक असो सांस्कृतिक असो शैक्षणिक असो की राजकीय असो समाजाचे नेतृत्व केले पाहिजे असे मौलिक विचार मांडले.
प्रसिद्ध शिवव्याख्याते मा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी तुडुंब भरलेल्या सभागृहामध्ये आपल्या वाणीने सभागृहाला मंत्रमुग्ध केले आणि शाहू महाराजांच्या महान प्रेरणादायी जीवन चरित्रावर प्रकाश टाकत बहुजनांच्या उन्नतीकरिता केलेले कार्य जनतेपर्यंत पोहचविले. प्रसिद्ध प्रबोधनकार डॉक्टर समीर कदम यांनी शाहू महाराजांचे विचार आजच्या परिस्थितीत देशाला आणि समाजाला कसे आवश्यक आहे याचे आपले अनोख्या शैलीत विवेचन केले. यावेळी मंचावर महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जा नगरचे मुख्य अभियंता पंकज सपाटे उद्घाटक म्हणून हजर होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांच्या छत्रपती शाहू महाराज समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर वासुदेव गाडेगोने, प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता हाजी अनवर, प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर संजय घाटे, प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर राजू ताटेवार, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भूपेंद्र लोडिया, ख्रिश्चन मिशनरी प्रचारक माननीय विजयजी नळे उपस्थित होते.
प्रस्तावना डॉक्टर दिलीप कांबळे आणि सूत्रसंचालन डॉक्टर मनीषा घाटे, डॉक्टर विनोद माहुरकर आणि डॉक्टर विद्या राणे यांनी केले. आयोजित कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले नागरिक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर राजू शेंडे, डॉक्टर प्रवीण डोंगरे, डॉ सचिन भेंदे, डॉक्टर विनोद मुसळे, डॉक्टर विवेक बांबोळे, डॉ. सचिन भेंदडे, डॉ. आशिष वरखेडे, निलेश मंगम, डॉ. मंगेश भरडकर, डॉ रितेश राणे,डॉ रुपेश सोंडवले, डॉ. प्रीती उराडे, डॉ. नम्रता बेंडले, डॉक्टर अर्चना गजभिये, डॉक्टर सुवर्णा सोंडवले यांनी अथक प्रयत्न केले.


