News 34 chandrapur
चिमूर - शुक्रवारी चिमूर शहरात साप्ताहिक बाजार असल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली होती, ढगाळ वातावरण असल्याने काही वेळेसाठी ऊन निघाली.
थोड्या वेळात आभाळात ढग जमायला सुरुवात झाली, विजेचा कडकडाट होऊ लागला, आणि अचानक तळोधी नाईक येथे 4 ते 4.30 वाजेदरम्यान वीज कोसळली. Lightning
ग्रामपंचायत जवळील कडूनिंबाच्या झाडावर ती वीज कोसळली, त्यामुळे झाडाचा काही भाग जळाला.
त्या कालावधीत जिल्हा परिषद शाळेची सुट्टी झाल्याने 2 मुली बचावल्या. मात्र मासळ (बु) येथील 35 वर्षीय प्रियंका किशोर मोडक ही शेतात काम करीत होती, काम आटोपून घरी परत येत असताना विजेच्या धक्क्याने प्रियंकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.