News 34 chandrapur
चंद्रपूर - पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सतत प्रयत्नामुळे अखेर मुंबई-बल्लारशा-मुंबई (ट्रेन नं. ०११२७/०११२८) साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन येत्या ५ जुलै पासून सुरू होत आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना थेट मुंबईला जाण्याकरीता मोठी सोय होणार आहे.
कोरोना काळापासून मुंबईला जाण्याकरीता थेट रेल्वे गाडी आजपर्यंत सुरू न झाल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच आम रेल्वे प्रवाशांना नागपूर किंवा वर्धा येथे जावून मुंबई करीता प्रवास करावा लागत होता. या नव्याने सुरू होत असलेल्या रेल्वेगाडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व अन्यत्र प्रवाशांना मोठी सोय झाली आहे.
Weekly train
सदर साप्ताहिक गाडी ही ५ जुलै रोजी (मंगळवार) लोकमान्य टिळक टर्मिनल येथून रात्री २१.४५ वाजता निघून बल्लारशाह स्थानकावर दुपारी १२.१० वाजता पोहचेल. सदर गाडी (क्र. ०११२८) बुधवार दि. ६ रोजी १३.४० वाजता बल्लारशाह वरून मुंबई करीता रवाना होईल. ही रेल्वेगाडी ठाणे, कल्याण, ईगतपूरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर,अकोला, बडनेरा, धामनगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर व बल्लारशाह. या स्थानकावर थांबणार आहे. जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन अहीर यांनी केले
Hansraj ahir
दरम्यान सदर रेल्वे गाडी ही प्रतीदिन करण्यासाठी तसेच या गाडीचा थांबा जैन बांधवाचे तिर्थक्षेत्र असलेल्या भांदक व गजानन महाराजांचे तिर्थस्थान असलेल्या शेगांव येथे तसेच व्यापारी दृष्ट्या महत्पूर्ण असलेल्या जळगांव व शिर्डी संस्थानास नजिक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावर मंजूर करण्यासाठी हंसराज अहीर यांनी मुख्य महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांना पत्र दिले आहे. ही रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) येथून सुरू व्हावी या करीता हंसराज अहीर विशेषत्वाने प्रयन्तशिल आहेत. पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्यामुळे चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना कोरोना काळापासून थेट मुंबई करीता गाडी उपलब्ध झाल्याने झेडआरयुसीसी सदस्य दामोदर मंत्री व श्रीनिवास सुंचूवार यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
Ballarpur-mumbai train
चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री - रमणिकभाई चव्हाण, दामोधर मंत्री, डॉ. भुपेश
भलमे, डॉ. सुशिल मुंधडा, महाविर मंत्री, प्रभाकर मंत्री, सुनिल भट्टड, रमेश बोथरा, रमाकांत देवडा, अनिश दिक्षीत,जगदिश जाधवाणी, नरेश लेखवाणी, प्रदिप माहेश्वरी, संजय मंघानी, आशिष मुंधडा, अशोक रोहरा, राजेश सादराणी,शाम सारडा, प्रल्हाद शर्मा, नरेंद्र सोनी, पुनम तिवारी, प्रमोद त्रिवेदी आदिनी सदर गाडी सुरू केल्याबद्दल हंसराज अहीर यांचे आभार मानून त्यांचे या लोकाभिमुख कार्याबद्दल अभिनंदन केले आहे.