चंद्रपूर - सध्या जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून अनेक नदी व नाले तुडुंब भरून वाहत आहे.
प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशाराही दिला आहे मात्र काहीजण निर्देशांचे पालन करताना दिसत नाही आहे. The bus got stuck in the flood
असाच एक भयावह प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर म्हणजेच तेलंगणा सीमेजवळ घडला. Police Rescue
मध्यप्रदेश राज्यातून हैद्राबाद येथे जाण्यासाठी निघालेली खाजगी बस च्या चालकाने लवकर ठरलेल्या ठिकाणी पोहचायचे असल्याने त्याने शॉर्टकट् मार्ग निवडला, मात्र राजुरा तालुक्यातील चिंचोली भागातील नाल्याला पूर आला होता, काहींनी चालकाला तिथून न जाण्याचा सल्ला दिला मात्र चालकाने त्याच मार्गावर वाहन नेले व बस पुढे नाल्याच्या मध्ये पोहचली त्यावेळी अचानक बस बंद झाली व त्यानंतर प्रवाश्यांचा जीव भांड्यात अडकला.
मात्र ऐनवेळी विरुर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता 35 प्रवाश्यांना सुखरूप त्या पुरातून बाहेर काढले.
Chandrapur police bravery
चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवीत धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस पुढे दामटली. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध- लहान मुले व महिला यांना बाहेर काढले. या सर्वांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे रवाना केले. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

