News 34 chandrapur
राजुरा:- तक्रारदार यांनी मौजा सास्ती शेतशिवारात शेती घेतली असून सदर शेतीचे फेरफार करून सातबारा नावावर होनेकरिता तक्रारदार यांनी तलाठी कार्यालयं सास्ती येथे अर्ज दिला असता महिला तलाठी यांनी शेतीचे फेरफार करून देण्याचे कामाकरीता तक्रारदार यांना लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान तडजोडीअंती तलाठी दीपाली भडके यांनी तक्रारदार यांचेकडे 20 हजार रू. लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.acb trap
5 जुलै 2022 ला तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर महिला तलाठी दीपाली भडके यांनी तडजोडीअंती 20 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. A bribe
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर, मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर. अविनाश भामरे, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पो.नि, जितेंद्र गुरनुले, नापोशि संदेश वाघमारे, पो. शि. रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, राकेश जांभूळकर, म.पो.शि. पुष्पा काचोळे सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर. चालक पो. शि.सतिश सिडाम, यांनी यशस्वीपणे पार पाडली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर
दुरध्वनी 07172-250251
श्री. अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. चंद्रपूर मो.क्र. 8888824599
पो. नि. शिल्पा भरडे मो. क्र.9850330031
पो.नी. जितेंद्र गुरनुले मो. क्र. 8888857184
टोल फ्रि क्रं. 1064
