News 34 chandrapur गुरू गुरनुले
मूल - चंद्रपूर गडचिरोली नागपूर छत्तीसगड मध्यप्रदेश कडे जाणाऱ्या महामार्ग या मुख्यरस्त्यावर असलेल्या मुल नगरातील मुख्य रेल्वे स्टेशनला लागून नविन मालधक्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याला लागूनच कर्मवीर महाविद्यालयाचे खेळाचे मैदान,व्यायाम करण्याचे ठिकाण मुलच्या नागरिकांसाठी फिरण्याचे एकमेव स्थळ आहे.
या मैदानावर शेकडो महाविद्यायीन विद्यार्थी, convent चे लहान विद्यार्थी सकाळ संध्यकाळ फिरत असतात. एवढेच नव्हेतर मूलच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी मर्निक वॉक करण्याचे एकमेव ठिकाण आहे. आणि अशा महत्वाच्या स्थळी हा मालधक्का सुरू झाला तर convent आणि महाविद्यालयाचे विद्यार्थ्याच्या आरोग्याला धोका होऊ शकतो तसेच फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी देखील धूळ,कार्बन, कर्कश आवाज होऊन आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.
नागरीकांना प्रदुषणाचा त्रास होणार आहे. त्यामुळे हा मालधक्का इतरत्र हलवावा अशी मागणी मूल येथील मार्निग ग्रुपचे असंख्य सदस्य यांनी मूलचे तहसिलदार यांचे मार्फतिने नाम.मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनातून केली आहे. चंद्रपूर, मूल, गडचिरोली, नागपूर महामार्गावरून छत्तीसगह, मध्यप्रदेश, तेलंगाना, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणावर जड वाहने हजारोच्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे ही वाहतूक दिवसा गनिक वाढत जात आहे. गोंदिया–बल्हारपूर हा रेल्वेमार्ग या राष्ट्रीय महामार्गावरूनच जात आहे. रेल्वे लाईनला लागूनच कर्मवीर महाविद्यालय, बल्हारपूर पब्लिक स्कूल, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आहे. या महामार्गाला लागूनच मूल शहरातील एकमेव कर्मवीर महाविद्यालयाचे मैदान आहे.
रेल्वे मालधक्का झाल्यास, येथे कच्चा लोहा, कार्बन मॅगनीज, फॉस्परस, गंधक, सिलीकॉन यासारखे घातक पदार्थ सर्वत्र पसरणार असून, सर्वांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे.
अनेक वर्षाच्या मागणीनंतर, मूल शहराचे सौंदर्यीकरण झाले. शहराचे सिमेवरच रेल्वेफाटक असून, रेल्वेमुळे वारंवार फाटक पडत असते. यामुळे वाहनाच्या रांगाच– रांगा लागत आहे. मालधक्का झाल्यास, ही समस्या आणखीनच गंभीर होण्यांची भिती आहे. शासनाने नागरीकांच्या आरोग्यांची अडचण लक्षात घेता हा मालधक्का इरतत्र हलवावा अशी महत्वाची मागणी प्रसिद्ध व्यावसायिक हिरेन शहा, जीवन कोंतमवार, अमोल सावकार बच्चूवार, दिनेश गोयल, राजू झोडे, नितीन येरोजवार, माजी नगसेवक प्रशांत समर्थ, माजी सभापती चंदू मारगोनवार, सुरेश फुलझेले, ऍड. अश्विन पोलीकर, डॉ.दिनेश वऱ्हाडे, गुडमॉर्निंग ग्रुप चे सर्व सदस्य आदीनी केली आहे.महेश गाजूलवार, किशोर गोगुलवार, प्रशांत लाडवे,राकेश ठाकरे, रुपेश मारकवार, सचिन चिंतावार, संजय भुसारी, श्रीकांत बुक्कावार, साई चीमद्यालवर, संदीप मोहबे, संतोष पालानदुर्कर, निलेश रायकांठीवार, यांचे सह मर्निग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

