चंद्रपूर - राज्यात वर्ष 2012 पासून सुगंधित, तंबाखू गुटख्यावर शासनाने प्रतिबंध आणला असला तरी आजही या सर्व प्रतिबंधित वस्तू खुलेआम बाजारात विकल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तर सुगंधित तंबाखू ची चक्क भेसळ करण्यात येत आहे, आतापर्यंत चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने 2 कारखान्यावर धाड मारली असून सुद्धा मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू ची तस्करी सुरूच आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई च्या नावावर मौन असला तर चंद्रपूर शहर पोलिसांनी मात्र शहरात प्रतिबंधित कॅन्सर पसरविणाऱ्या वस्तूची वाहतूकिवर आळा घालण्याचे काम सुरू केले आहे. banned aromatic tobacco
20 जून ला स्थानिक गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांना सुगंधित तंबाखूची तस्करी करणारे वाहन शहरातून जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. Tobacco mafia
माहितीच्या आधारे सपोनि निर्मल यांनी पथकासह सापळा रचला असता बाबूपेठ पोलीस चौकीसमोर अन्न व औषध सुरक्षा विभाग व पोलिस यांनी नाकाबंदी केली.
त्यावेळी MH27BS2838 या वाहनाला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये 5 लाख 52 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला.
अन्न सुरक्षा अधिकारी गिरीश सातकर यांनी पंचनामा करीत सदर माल जप्त केला.
पोलिसांनी वाहनचालक 38 वर्षीय आरिफ मेहताब खान व सहकारी 32 वर्षीय शेख शाकिर शेख रहमान यांना अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अनव्ये गुन्हा नोंद करीत ताब्यात घेतले.
पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सपोनि जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चूनारकर, चेतन गजलवार, सचिन बोरकर, इम्रान खान व रुपेश रणदिवे पार पाडली.

