News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - दिनांक 1/6/2022 बुधवार ला दुपारच्या सुमारास सिंदेवाही पोलीस ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम राबवीत असताना एक इसम हा दारूच्या नशेत मोटर सायकल वाहन चालवीत असता पोलिसांना मिळून आला. alcohol driving
घनश्याम दांडेकर वय 47 राहणार मुरमाडी तालुका सिंदेवाही हा आपल्या स्वतःच्या ताब्यात असलेले मोटर सायकल वाहन क्रमांक एम एच -34 वाय - 6839 हिरो कंपनीचे पँशन प्रो दुचाकी वाहन हे सिंदेवाही शहरातील दसरा चौकातील रस्त्यांवर नागमोडी वळण मार्ग असल्यासारखं सरळ रोड मार्गावर वाकडे - तिकडे करून चालवीत असताना सिंदेवाही पोलिसांनी पकडले. Police case
घनश्याम दांडेकर याला ताब्यात घेतले व सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन त्याची वैद्यकीय तपासणे केले असता घनश्याम हा दारू च्या नशेत मिळुन आला. drink n drive
त्यानुसार वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालानुसार सिंदेवाही पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी यावर 185 अंतर्गत मोटार वाहन कायद्या नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई सिंदेवाही ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सावसाकडे ,संजीव गेडेकर, वंसता कुंभरे ,राहुल रहाटे यांनी केली आहे.
