(तालुका वार्तापत्र गुरु गुरनुले)
News 34 chandrapur
मूल: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्व. दादासाहेब कन्नमवार यांचा पूर्वीपासूनच निर्वाचन क्षेत्र असलेल्या व राजकीय दृष्ट्या अती सवेंदनशिल राहिलेल्या क्षेत्रात मुल नगरपरिषद निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून निवडणुका काही महिन्यात होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी बाकावर असलेल्या नगरसेवकाना निवडणुकीचे वेध लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.
मूल मध्ये सध्या प्रशासकाच्या हातात न. प. चा कारभार सुरु आहे. नगर परिषद स्थापने पासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. अनेक विकासाच्या योजना काँग्रेसच्या कार्यकाळ राबविल्या गेल्या. तरी देखील राजकीय नेते व माणसे बदलली की, मतदार देखील बदलत असतो, आणि सत्ता परीवर्तन हा निसर्गाचा जणू नियमच आहे. चांगले काम केले तरी बदलते आणि काहीही नाही केले तरी देखील सत्तेत परीवर्तन होतच असते. परंतु गेली काही वर्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता होती. नंतर सत्तेची सूत्रे माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात राहिली. आता मात्र विद्यमान आमदार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली असून त्यांचा कार्यकाळ संपुश्टात येऊन नुकताच निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यासाठी सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ते मोर्चे बांधणीला लागलेआहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विकास निधी आणून केलेल्या विकासकामांमुळे मुल नगराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. अनेक कामे चांगली झाली असेल तरी देखील काही कामावर विरोधकांकडून टीका -टिपणी केली जात आहे. ती होणेही अभिप्रेत आहे. मागील निवडणुकीत मूलच्या नागरिकांनी भाजपला एक हाती सत्ता दिली. तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. यामधे भाजपची पकड मजबूत असली तरी मात्र याला काँग्रेसच्या सत्ता भोगलेल्या वरिष्ठ नेत्यांमधील गटबाजी आणि काँग्रेसचे काही नेते फक्त बॅनर फोटो लावण्यासाठी व काँग्रेसचा राज्यस्तरीय नेता आला की, स्टेजवर येऊन बसण्यापूर्तेच मर्यादित आहेत. कोणतीही निवडणूक लागली की, काँग्रेसच्या चिन्हावर पदे भोगलेले, आमदार, जिल्हा परिषदेवर राज्य करणारे नेते, मात्र पैसे खर्च कोण करणार म्हणून अन्य निवडणुका लढविण्यासाठी पडद्यामागे होतात.
मग काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी पदे भोगलेले नेते जनतेपुढे का येत नाही. निवडणुका आल्या की, तिकीट मागण्याच्या लाईनीत मागे असणारे नेतेच सर्वात पुढे जाऊन बसतात. हेही तेवढेच महत्वाचे खरे कारण आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारार्थ जाहीर सभेच्या तारखा देऊनही नेते मुल येथे येऊ शकले नाही, हाही काँग्रेससाठी चिंतनाचा विषय जरी असला तरी मात्र, भाजपच्या दृष्टीनेही तेवढाच गांभीर्य जाणून घेणारा विषय आहे. हेही सत्य नाकारता येत नाही. भाजपचे उमेदवार विकास होऊनही सहजासहजी निवडून आलेले नाही, त्यासाठी सुधीर भाऊंना खूप प्रयत्न करावे लागले. एका महिला नगरसेविकेला अपत्याच्या कारणाने पदमुक्त व्हावे लागले. आणि पार पडलेल्या निवडणूकीत भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळेच नगराध्यक्ष यांच्या वार्डतीलच उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. आणि पोट निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला हा भाजपसाठी चिंतनाचा विषय असल्याचे गृहीत धरावेच लागेल. हे सत्य कोणीही नाकारु शकत नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मध्ये ८ प्रभागातून १७ नगरसेवक निवडून आले होते. तर आता १० प्रभाग पाडण्यात आले असून २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. Municipal council election

विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरात केलेल्या विकासकामावर भाजपला आमचीच सत्ता येईल असे वाटत आहे. तर काँग्रेसचे नेते, माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बँकेला झालेल्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी शेतकरी कल्याण निधीची तरतूद करून अनेक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले, शेतकरी व शेतमजूर यांना झालेल्या कॅन्सर,हार्ट सारख्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी ४० हजार पर्यंतची मदत जीवनदान दिले. वाघाने जनावर व मानवावर हल्ला करून ठार मारल्याने त्यांनाही आर्थिक मदतीचा हात दिला आहे. महिला बचत गटांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले. भारताचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या नावाने त्यांच्या स्मृति्पीत्यर्थ स्वावलंबन योजना लागू करुन हजारो युवकांना रोजगार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्याने काँग्रेसला अच्छे दीन येण्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान सभा प्रमुख सुमित समर्थ हे सुध्दा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांना बोलाऊन निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करून आपले उमेदवार उभे करण्यासाठी जय्यत तयारी करीत आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेकडे निवडणुक लढविण्याकरिता सध्यातरी तगडा नेता नाही. निवडणूकीत सर्वच पक्षातील तगडे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात असल्याने निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असून तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी तर्फे निवडणुका लढविल्या जातात की, सर्व पक्ष स्वतंत्र पणे लढवतात हे अजूनही निश्चित नाही ? परंतु सध्यातरी सत्ता राखण्यात भाजप यशस्वी होईल की सत्ता परिवर्तन करण्यास काँग्रेस यशस्वी ठरेल ही येणारी वेळच सांगेल.