News 34 chandrapur
चंद्रपूर - आज ज्येष्ठ पौर्णिमा,अर्थात वटपोर्णीमा!सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने यमलोक गाठलं. तेव्हापासून ह्या व्रताला सुरुवात झाली .पतीचे आरोग्य चांगले राहावे व सातजन्म हाच पती मिळावा हा यामागचा हेतू!पण काळ बदलला आणि बदलत्या काळानुसार परंपरेने चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यावर विचारमंथन होऊ लागलं.प्रत्येक परंपरेला काय शास्त्रीय आधार आहे, ह्यावर विचारमंथन होऊ लागलं.
हाच धागा पकडून जुन्या परंपरेला छेद न देता, जून्या विचारांची कास धरत ,नव्या विचारांची सांगड घालत ,जुनी वटसावित्री ते आधुनिक वटसावित्री यांचा मेळ घालत एक नवीन संकल्पना महिला संस्कार कलश योजनेच्या अध्यक्षा उषाताई बुक्कावार यांनी आणली आणि सर्व संस्कार कलश च्या महिलांनी त्यांना साथ देत ती प्रत्यक्षात आणली. आज पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान, पांढरकवडा येथील जागृत हनुमान मंदीरात तब्बल पंधरा झाडांचे रोपण करण्यात आले. वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेता एकूण दहा वडाची झाडे आणि पाच चाफ्याची झाडे, त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन लावण्यात आली. याप्रसंगी पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान, पांढरकवडा चे सचिव श्री.लक्ष्मणजी सादलावार, उपाध्यक्ष श्री. के. बी. गौरकार,कोषाध्यक्ष बापुरावजी कुकुर्डे, सरपंच पांढरकवडा सुरेशजी तोतडे प्रामुख्याने उपस्थित होते. Vatpoornima
संस्कार कलश योजनेच्या अध्यक्ष सौ.उषाताई बुक्कावार, उपाध्यक्षा श्रीमती कल्पनाताई पलिकुंडवार, सचिव सौ .रचीताताई रेगुंडवार तसेच महिला संस्कार कलश योजनेच्या ५० महिला सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या संचालन व आभारप्रदर्शन सौ.रोहिणी नि.नीले यांनी केले. वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

