News 34 chandrapur
चंद्रपूर - नविन चंद्रपूर म्हाडा परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने म्हाडाचे अधिकारी निकृष्ट कामाची पाठराखण करीत आहे. Drainage tunnel
यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले ६ जुनपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. Committee of Inquiry
आठ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची पालकमंत्र्यांनी दखल घेतली. जिल्हा प्रशासनाने आज उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत केली. समितीला १५ दिवसात बेले यांनी आक्षेप घेतलेल्या प्रत्येक मुद्दा बाबत सखोल चौकशी, तपासणी व याबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. Mhada
आंदोलनाच्या आठव्या दिवशी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजेश बेले यांच्याशी संपर्क करून म्हाडाच्या गटार योजनेची उच्च स्तरीय समिती गठीत करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. mhada flats पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी उच्च स्तरीय समिती गठीत केली. व १५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पालकमंत्री यांनी चौकशी व कारवाई चे आश्वासन देऊन म्हाडाच्या भ्रष्टाचार ची दखल घेत वेळ पडल्यास कारवाई करू अशी ग्वाही दिली. याबद्दल पालकमंत्र्यांचे राजेश बेले यांनी आभार मानले. व अन्नत्याग आंदोलन स्थगित करीत असल्याचे घोषित केले.
Notice the movement
चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढिल भुमिका स्पष्ट केली जाईल असे राजेश बेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.