News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील सत्रापासून शालेय पोषण आहार योजना अंतर्गत खाद्यतेल पुरवले जात नाही तसेच या सत्रात गॅस जोडणी करण्याच्या सूचना आहेत त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद मात्र करण्यात आली नाही करिता पूर्वीप्रमाणे खाद्य तेल शासनाने पुरवावे व गॅस रिफिलिंगची व्यवस्था करावी अशी मागणी पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी नागपूर येथे शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फतीने शासनाकडे केली.
मा.आमदार अभिजित वंजारी पदवीधर विभाग यांच्या पुढाकाराने मा.वैशाली जामदार शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे शिक्षक समस्या निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व वेतन पथक अधिकारी उपस्थित होते. या सभेत राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी संघटनेच्या वतीने खालील समस्या मांडल्या. शालेय पोषण आहार योजना अंतर्गत शाळांना खाद्यतेल व गॅस सिलेंडर gas cylinder पुरवावे, पीएफएमएस समग्र शिक्षा योजनेतील मागील सत्राचा परत गेलेला निधी शाळांना परत देणे, सर्व विषय शिक्षकांना समान काम समान वेतन अंतर्गत वेतनश्रेणी मिळावी, कोर्ट आदेश प्रमाणे कोर्टात न गेलेल्या इतर पात्र शिक्षकांनाही आदिवासी एकस्तर चा लाभ मिळावा, जिल्ह्यातील पात्र विज्ञान विषय शिक्षकांना वेतनश्रेणी मिळावी, मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात यावी, अभावीत केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात यावी यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित पदोन्नती व संपकालीन कपात वेतन सह अन्य प्रलंबित समस्या यावेळी मांडण्यात आल्या या समस्यांचा निपटारा करण्यात येईल व शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन आमदार अभिजितदादा वंजारी यांनी दिले. यासह मा.विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालयात भेट देऊन प्रलंबित समस्यांची निवेदने देण्यात आली. school nutrition scheme
यावेळी सोबत राज्य कार्यकारी सचिव निखिल तांबोळी, चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी नारायण कांबळे जिल्हा नेते, संजय चिडे जिल्हा सरचिटणीस, आकाश झाडे तालुका अध्यक्ष, राजेंद्र धानोरे तालुका संघटक, नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर सोनवणे हे पदाधिकारी उपस्थित होते.
