चंद्रपूर - अतिविशिष्ट, जनप्रतिनिधी यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विश्रामगृहाची व्यवस्था केली आहे, मात्र आता हे विश्रामगृह राजकीय पक्षाच्या बैठकीचे ठिकाण बनले आहे.
मध्यंतरी चंद्रपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राजकीय पक्षांना बैठकीसाठी नो एन्ट्री चा फलक लावण्यात आला होता मात्र त्या फलकावरील शब्द तात्पुरते मर्यादित राहीले. Circuit house
मात्र आता तर काही जनप्रतिनिधी यांच्या नावावर दिवसभर विश्रामगृहातील रूम बुक असतात, अतिविशिष्ट कमी आणि काही उचापती विशिष्ट बैठकी मोठ्या प्रमाणात होत असतात. Pwd maharashtra
चंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात बैठकीच्या नावाखाली राडे व्हायला लागले आहे, याचे मोठे दुष्परिणाम भविष्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला भोगावे लागणार आहे.
17 जून ला दुपारी सार्वजनिक विश्रामगृहात जिल्हा परिषद, नगरपरिषद व चंद्रपूर मनपा निवडणुकीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Mns adhikrut
बैठक सुरू होताच काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली सदर चकमक इतकी वाढली की पुढे त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. Chandrapur local news
निवडणुकी आधी पक्षातील अंतर्गत वादामुळे मनसे ला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते याची जाणीव असताना सुद्धा पक्षातील पदसिध्द पदाधिकाऱ्यांनी या वादावर बोलणे टाळले.
सदर वाद हा आर्थिक घोटाळ्यासंदर्भातील असल्याचे बोलले जात आहे, चंद्रपुरात गुंतवणूकदारांना दाम दुपट्टीचे आमिष देत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस का आणला याबाबत हा वाद होता. Political fight at rest house
वाद तर झाला आणि शासकीय विश्रामगृहात काही वस्तूंचे नुकसान ही झाले, सदर वादानन्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सज्ञान घ्यावे अन्यथा मोठी घटना विश्रामगृहात नक्कीच घडणार.