News 34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्याला लागून असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर क्षेत्र हे रिझर्व्ह फॉरेस्ट असल्याने या क्षेत्रामधून रोजच मोठ्या प्रमाणात जंगल सोडून वाघ गावाकडे यायला लागले आहेत. त्यामुळे वाघाने अनेक शेतकरी, शेतमजूर व त्यांचे जनावरे बळी पडले आहेत.
अनेक कुटुंब कमवत्या व्यक्ती अभावी निराधार होत आहेत. करिता वनविभागाने गावाकडे धाव घेणाऱ्या वाघांचा त्वरित बंदोबस्त करावा व जंगलाला लागून असलेल्या शेतीला आणि परिसराला तात्काळ सोलर कुंपण लावण्यात यावे अशी मागणी भदूर्णी, पडझरी, उसराला चक, मरोडा, कोसंबी, करवन, आदी गावातील नागरिकांनी स्थानिक ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे नेतृत्वात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक रामगावकर यांचेकडे अनेक गावच्या नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यातील पडझरी, भादुर्णा, उश्राळा, उश्राळा चक, मारोडा या गावातील काही व्यक्ती वाघाच्या हल्लात ठार झाले, यामुळे संपुर्ण कुटुंब वाऱ्यावर पडलेले आहे, यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांकडुन केली आहे, यासह गावासभोवताल असलेले झुडुप कापुन जागा त्वरीत मोकळी करण्यात यावे, बफर झोन परिसरात असलेल्या गावातील शेतकऱ्याना निस्तार हक्काचा अधिकार कायम असल्यामुळे त्यांना लागणाऱ्या जंगलाच्या वस्तु मिळण्यास वनविभागाने अडथळा आणु नये, रानडुक्करामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे, त्यामुळे 100 टक्के अनुदानावर solar सोलर कुंपन लावुन देण्यात यावे यासोबतच गावाजवळ नविन रोपवण तयार करण्यात येवु नये असा मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना माजी मंत्री शोभाताई फडणवीस, मारोडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक लोकनाथ नर्मलवार, मारोडाचे सरपंच भिकारू शेंडे, सचिन गुरनुले, नरसिंग गणवेनवार, भादुर्णाचे सामाजिक कार्यकर्ते, विक्रम गुरनुले, उश्राळाचे सुरेश नेवारे, पडझरीचे नागो नागोशे, शांताराम कन्नाके, परशुराम मडावी, संजय पेंदोर भादुर्णाचे नागेश वाढई उपस्थित होते.