News 34 chandrapur
मुंबई - राज्यातील राजकारणात आता काय होणार याचा काही नेम लागत नसून, एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, शिंदे यांना सेना आमदारसाहित अपक्षांची साथ त्यांना सत्तेजवळ नेणार काय? हे चित्र अजूनही स्पष्ट झाले नसले तरी सेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
Shivsena rebal
Shivsena rebal
तुमच्या मनात जे आहे तेच करू आधी मुंबईत या माझ्याशी बोला, जर तुम्हाला मी मुख्यमंत्री पदी वाटत नसेल तर मला सांगा मी लगेच राजीनामा देणार असेही वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. Latest news on maharashtra politics
25 जून ला मुंबईत शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक असून त्यामध्ये राज्य कार्यकारणी मधील पदाधिकारी व सदस्य व जिल्हाप्रमुख यांना मातोश्री वरून बैठकीला येण्याचे आदेश मिळाले आहे.
सदर बैठकीत राज्याच्या राजकारणात मोठी खेळी होणार असे संकेत मिळत असून बंडखोर शिंदे यांच्यावर पक्ष श्रेष्ठी तर्फे कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. Uddhav thackeray
शिंदे यांना बैठकीत शिवसेनेच्या नेतेपदावरून काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सुद्धा शिंदे गटाने दावा केला आहे, आम्हीच खरे शिवसैनिक आहोत अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार देत आहे. Shivsena vardhapan din 2022
आजच्या बैठकीत राज्यातील जिल्हाप्रमुख व कार्यकारणी सदस्यांनी शिंदे गटाला महत्व देऊ नये यासाठी काही आदेश सेना भवणातून मिळणार काय? या प्रश्नाचे उत्तरही बैठकीनंतर मिळणार.