News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस चंद्रपूर युवासेनेने बालगृहातील मुलांमध्ये केक कापून साजरा केला. Yuvasena chandrapur
चंद्रपुरातील वांढरी स्थित बालगृहात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी मुलांच्या हाताने केक कापला. Aaditya thackeray birthday
यावेळी लहान मुलांमध्ये युवासेनेने भोजनदान करीत भविष्यात बालगृहासाठी कसलीही गरज भासल्यास युवासेना नेहमी मदत करण्यास तत्पर असेल अशी हमी विक्रांत सहारे यांनी दिली.
यावेळी सुमित अग्रवाल, बाळू भगत, प्रणित सरकार, सुजित पेंदोर, शिवा वजरकर, शैलेश भगत यांची उपस्थिती होती.