चंद्रपूर - 3 जुन ला बाबूपेठ येथे 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी संदीप राठोड यांचे मित्र पीडित मुलीच्या परिवाराला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांनी केला आहे.
4 जून ला आरोपी संदीप राठोड यांचे विरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिसांनी तात्काळ राठोड यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली होती. Pocso
मात्र त्यानंतर आरोपीच्या मित्रांनी पीडित मुलीच्या परिवाराला त्रास देणे सुरू केले, पीडित मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत, आमच्या वस्तीत रहायचे नाही असा फर्मान आरोपींच्या मित्रांनी काढला.
याबाबत पीडित परिवाराने जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना सोनू कांबळे, देवानंद कोवे, सिद्धार्थ उपरे, बबलू चौधरी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
पीडित परिवार 5 दिवसापासून आपल्या घरी गेला नाही, आमच्या जीवाचे बरेवाईट होणार तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पीडित परिवाराने पत्रकार परिषदेत केला.
पीडित परिवाराने पोलीस अधीक्षकांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. Police security
आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार देणारे पीडित मुलीचे वडील आता परिवाराच्या सुरक्षेसाठी पोलीस व नागरिकांची मदत मागत आहे.
